Tuesday, March 17, 2015

Aakanksha Rangabhoomi!

हॅल्ल्लो !!!

आकांक्षा च्या ब्लॉग ला आरंभ झाला!

आपापल्या कल्पना, काही नवीन वाचल्यास ते, छान विचार सुचले तर ते...
थोडक्यात जे "छान" आहे, आणि "शेअर" कारावसं वाटतं ते सर्व काही इथे लिहावं, हा या उपक्रमाचा उद्देश!

आम्ही जर्मन शिकताना "क्रिएटीविटी" ची "थेअरी" शिकलो होतो. (!!!) थोडं विचित्र वाटतं खरं ऐकायला; पण अशा अनेक विचित्र गोष्टीतूनच काहीतरी चांगलं घडत असतं. मला त्यात जो चांगला विचार वाटला, तो हा -
"प्रत्येक मनुष्य  क्रिएटीव असतो." !
अनेकदा या विचारला मी वेड्यात काढलं, त्यावर हसले, "त्यात काय एवढं नवीन" असं वाटून हाड् केलं, पण तरीही मनातून हा सकारात्मक विचार गेला नाही, हे नक्की!
आज हा ब्लॉग उघडताना मला अक्षरशः आपल्या ग्रूप मधल्या खूप क्रिएटीव मोमेंट्स असा एखादा सिनेमा बघावा, तशा आठवल्या, आणि वाटलं, की नाही यार, खरी आहे म्हणजे थेअरी!!

बघूया, आता या  थेअरी चं प्रॅक्टीकल कसं कसं होतंय!!